भारतीय संस्कृति आणि परंपरेमध्ये मनुष्य जीवन आणि निसर्ग यांचा परस्पर सुयोग्य मेळ पहावयास मिळतो, ज्याची शास्त्रोक्त रचना ही विविध व्रत आणि उत्सवांद्वारे पूर्व ऋषींनी केलेली दिसते. याकरिता हिंदू पंचांगानुसार येणाऱ्या प्रत्येक महिन्यातील व्रत-उत्सव पर्व, त्यांचे संक्षिप्त पूजा विधी आणि महत्त्व जाणणे अत्यावश्यक होय.
- व्रताचे नाव : मंगळागौरी व्रत
- व्रत कालावधी : श्रावण महिन्यातील मंगळवार, विवाहोत्तर पाच वर्षे
- पौराणिक संदर्भ : भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला याचे महत्त्व सांगितले आहे
श्रावणे मंगलागौरी पूजये द्विधिनाव्रती |
प्रथमे वत्सर मातृगृहे कर्तव्यमेवच ||
ततो भर्तुगृहे कार्यमवश्यं स्त्री भिरादरात् |
पन्चमे वत्सरे प्राप्ते कुर्यादु द्यापनम् शुभम् || (भविष्यपुराण )
- व्रत देवता : विवाह संस्कारात ‘ गौरीहर पूजन विधी ’ मध्ये वधू धान्यराशीवर आसीन अन्नपूर्णा देवीचे पूजन करते. श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी अन्य नवविवाहीतांसह हिचे पूजन करण्यात येते, जी या व्रताची प्रमुख देवता होय
संक्षिप्त पूजाविधी :
- घरातील जेष्ठांना वंदन करून नवविवाहितेने इतर पाच सुवासिनींसह नूतन वस्त्र परिधान करून पुजेस बसावे.
- धूप – दीप लावावा.
- आचमन, प्राणायाम करून पुढील संकल्प (अक्षतासह पाणी हातावरून) सोडावा –
मम इह जन्मनि जन्मान्तरे च अखन्ड सौभाग्य पुत्रपौत्रादि अभिवृद्धि,
अन्नधान्य समृद्धि सिद्धिद्वारा मंगलागौरी देवता प्रीत्यर्थं
यथाज्ञानेन यथाशक्ति यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि
षोडश उपचार पूजनं अहं करिष्ये |
- गणेशपूजन – (श्रीगणेशाचे यथोपचार पूजन करावे)
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
- कलशपूजन – (चौरंगावर मधोमध धान्यराशीवर कलश मांडावा, त्याला सुताने वेढावे, त्यामध्ये आम्रपल्लव, सुपारी, नाणे घालावे तसेच त्यावर एक थाळी झाकावी जेणेकरून गौर ठेवता येईल व पूजन करावे)
वरुणाय नमः |
- मंगळागौरीचे ध्यान – (ध्यान म्हणून पुष्प वहावे.)
कुंकुमा परिलिप्तान्गां सर्वा भरण भूषिताम् |
नीलकण्ठ प्रियां गौरी वन्देऽहं मङ्गलाव्हयाम् ||
मन्गलागौर्यै नमः |
- यानंतर खालील मंत्र म्हणून आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, पंचामृतस्नान, शुद्धोदकस्नान, गन्धोदकस्नान, मांगलिक स्नान, महाभिषेक स्नान ई. विविध उपचारांनी यथामती पूजन करावे.
नमो देव्यै महा देव्यै शिवायै सततं नमः |
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् ||
- यानंतर गौरीदेवीला पुसून गंध, अक्षत, हळद-कुंकू, सिंदूर आदी वाहून आसनस्थ करावे. (बाजूला एका थाळीत कणकीचा पाटा-वरवंटा ठेवावा.)
- अंगपूजा – आठवेळा पायापासून डोक्यापर्यंत “गौर्यै नमः” असे म्हणून अक्षता वहाव्या.
- पत्रीपुजा – १६ प्रकारच्या यथालाभ पत्री (पाने) वहाव्यात.
- वायन व धान्यमुष्टी अर्पण – आपापल्या कुलाचारानुसार वायन व धूप, दीप, नैवेद्य, विडा, नारळ अर्पण करावे. तसेच तीळ, तांदूळ, जिरे यांची धान्यमुष्टी वहावी. मंत्रपुष्पांजली वहावी.
- अर्घ्य दान – पळीमधील पाण्यात गंध, अक्षत, पुष्प, सुपारी, नाणे ई. घेवून ३ अर्घ्य द्यावेत.
मन्गलागौर्यै नमः इदं अर्घ्यं दत्तं न मम |
- प्रदक्षिणा, नमस्कार व मनोमन प्रार्थना करावी.
- कर्म समर्पण – (हातावरून पाणी सोडावे.)
अनेन यथाज्ञानेन यथोपचार कृत पूजनेन श्री मंगलागौरी देवताः प्रीयतां न मम |
महत्त्व :
- उपरोक्त पूजन हे त्रोटक स्वरुपात होय, शक्य असल्यास पुरोहितास पाचारण करून पूजा संपन्न करावी.
- हिंदी भाषिक माताभगिनी याचप्रमाणे ‘गणगौर’ पूजन करतात.
- गृहस्थाश्रमाचा आरंभ हा आनंद, श्रद्धाभाव, सकारात्मकता व समृद्ध विचार, व्यवहार व विहाराने करण्याचे संकेत येथे सूचित होतात.
- प्राप्त ऋतूत प्राप्त होणाऱ्या आघाडा, केना, बेल, मोगरा, तुळस, शमी ई. विविध वनस्पति या विविध औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत, त्या पत्रींनी होणारी पुजा त्यांचे महत्त्व व्यक्त करतात.
- सनातन धर्म, प्रगल्भ संस्कृति व प्राचीन विज्ञानाधीष्ठीत परंपरेचे महत्त्व जाणून घ्यावयाचे असल्यास हे व्रत करणे अत्यावश्यक होय
सुंदर माहिती याचा उपयोग निश्चित होईल
थोडक्यात पण अतिशय समर्पक मार्गदर्शन
अत्यंत उपयोगी उपक्रम…..
छान माहिती मिळाली.
उपयुक्त माहिती
उत्तम माहिती
Very useful in this period of lockdown.
सुप्रभात, लिंक उपलब्ध केल्या बद्दल शतशः धन्यवाद! सर्वे भवंतू सुखिन: सर्वै संतू निरामय:, कल्याण वस्तू।
खुप उपयुक्त माहिती . नवीन पिढीपर्यंत हे पोहोचणे आवश्यक आहे
Very much Informative and It is pleasure for mi to have such kind of knowledge about our Traditional mangalgauri puja…
सुंदर उपक्रम, सर्वांना उपयुक्त राहील. विनंती आहे की आगामी व्रतवैकल्यांची माहिती व त्यांचे महत्त्व विषद करावे जेणेकरुन नवीन पिढीतील जिज्ञासूना माहिती होईल.
।।श्री सदगुरूनाथ महाराज की जय।।
Khup chhan mahiti ani pooja vidhi.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज आलेली माहीती खुपच छान व बोधप्रद आहेत सर्वांचे मनापासून आभार भविष्यात असेच माहीती व मार्गदर्शन लाभत राहो…
🌹🙏🌹
नाथ साहेब की जय
फारच उपयुक्त माहिती, हल्लीच्या धावपळीच्या जीवनात शास्त्राप्रमाणे ,पण थोड्या वेळात पुजा विधी ची माहिती कळल्याने इच्छुकांना लाभ घेता येईल, अशीच माहिती प्रत्येक सणवार कळल्यास ज्ञानात भर पडेल व आचरणात आणता येइल
अतिशय सोप्या शब्दांत भारतीय सणांचे महत्व सांगितले आहे ,असेच मार्गदर्शन नेहमी मिळावे हीच सदिच्छा💐💐💐💐
वा खूप छान
अत्यंत उपयुक्त आणि सुंदर पुजा विधी.आपले खुप खुप धन्यवाद.
नमस्कार, आज या प्रकारच्या माहितीची नितांत आवश्यकता आहे. या पिढीला आपली व्रतवैकल्ये, सण, कुळाचार कळलेच पाहिजेत. ही काळाची गरज आहे. घरातील मोठ्यांनी ती सांगावीत व लहानांनी तो वसा पुढच्या पिढीकडे दयावा.
धन्यवाद
कणकेच्या पाट्या वरवंट्याचे काय महत्व आहे? त्याची पण पूजा करायची का?
Chhan mahiti
Khoopach upayukta mahiti Shree Krishna ne sangitale Dharmaraj Yudhisthir hyana mhanaje khoop prachin vrat ahe hi mahiti navyane kalali, dhanyawad hya mahitisathi 😊🙏
मोलाची माहिती . नवीन पिढीला परंपरांची ओळख करून द्यायला खूप मदत होईल . धन्यवाद .
プレドニン処方 – г‚ёг‚№гѓгѓћгѓѓг‚Ї еЂ¤ж®µ г‚ёг‚№гѓгѓћгѓѓг‚ЇгЃ®йЈІгЃїж–№гЃЁеЉ№жћњ
Your comment is awaiting moderation.