ऋषीपंचमी

 • व्रताचे नाव :  ऋषीपंचमी
 • व्रत कालावधी :  भाद्रपद शु. पंचमी

सा माध्यान्ह व्यापिनी ग्राह्या |
दिनद्वये मध्यान्ह व्याप्तौ तदव्याप्तौ च पूर्वा ||

पूजा मांडणी

चौरंगावर वस्त्र आच्छादित करून तांदळाचे आठ पुंजके ठेवावे. त्यावर कश्यपादी सात ऋषि व अरुंधती यांच्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे आठ सुपाऱ्या मांडाव्यात.

पूजा विधी

शास्त्रोक्त पद्धतीने प्रचलित पूजा विधि अशाप्रकारे,

 • वंदन : घरातील थोरामोठ्यांना तसेच कुलदेवतेस वंदन करून पुजेस बसावे.
 • आचमन / प्राणायाम : तीन वेळेस पळीने पाणी प्राशन करून चौथ्यांदा सोडावे व प्राणायाम  करावा.
 • देवतास्मरण :

कुलदेवताभ्यो नमः| ग्रामदेवताभ्यो नमः| एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः|

 • संकल्प

मया इह जन्मनि जन्मान्तरे च ज्ञानतो अज्ञानतो व रजस्वला अवस्थायां कृत संपर्क जनित दोषपरिहारार्थं
अरुन्धती सहित कश्यपादि सप्तर्षि प्रीतिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थं यथाज्ञानेन पूजनं अहं करिष्ये |

 • श्रीगणेश पूजन

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || श्रीगणेशाय नमः ||

 • पृथ्वी पूजन :

पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता | त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् || भूम्यै नमः ||

 • न्यास विधि : विष्णवे नमः |”, असे १२ वेळा म्हणून डोक्यापासून पायापर्यन्त स्वतःची शरीर शुद्धि करावी.
 • कलश पूजन :

कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः |
मूले तत्रस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः || कलशाय नमः ||

 • शङ्ख पूजन :

त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे |
नमितः सर्व देवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते || शङ्खाय नमः ||

 • घण्टा पूजन :

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम् |
कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हान लक्षणम् || घण्टायै नमः ||

 • दीप पूजन :

भो दीप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः |
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वान्कामान्प्रयच्छ मे || दीपदेवताभ्यो नमः ||

 • ध्यान : हातात अक्षता, फुले घेवून आवाहित देवतेचे पुढील श्लोकांनी ध्यान करून अर्पण करावे.

मूर्तं ब्रह्मण्य देवस्य ब्रह्मणस्तेज उत्तमम् | सुर्यकोटि प्रतिकाशं ऋषिवृन्दं विचिन्तये ||अरुन्धतिसहित कश्यपादि सप्त ऋषिभ्यो नमः ||

 • आवाहन : यानंतर पुढील प्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशाप्रकारे आवाहन करावे.

श्रीकश्यप ऋषि – कश्यपः सर्व लोकेशः सर्व देवेषु संस्थितः | नराणां पापनाशाय ऋषिरूपेण तिष्ठति ||
श्रीअत्रि ऋषि – अत्रये च नमस्तुभ्यं सर्वभूत हितैषिणे | तपोरुपाय सत्याय ब्रह्मणेsमित तेजसे ||
श्रीभरद्वाज ऋषि – भरद्वाज नमस्तुभ्यं सदाध्यान परायण | महाजटील धर्मात्मा पापं हरतु मे सदा ||
श्रीविश्वामित्र ऋषि – विश्वामित्र नमस्तुभ्यं बलिंमखम् महाव्रतम् | अध्यक्षीकृत गायत्री तपोरूपेण संस्थितम् ||
श्रीगौतम ऋषि – गौतमः सर्वभूतानां ऋषीणां च महाप्रियः | श्रौतानां कर्मणां चैव संप्रदाय प्रवर्तकः ||
श्रीजामदग्नी ऋषि – जमदग्निर्महातेजाः तपसा ज्वलितप्रभः | लोकेषु सर्व सिद्ध्यर्थं सर्वपाप निवर्तकः ||
श्रीवसिष्ठ ऋषि – नमस्तुभ्यं वसिष्ठाय लोकानां वरदाय च | सर्वपाप प्रणाशाय सूर्यान्वय हितैषिणे ||
श्रीअरुन्धती देवी – अरुन्धति नमस्तुभ्यं महापाप प्रणाशिनि | पतिव्रतानां सर्वासांग धर्मशील प्रवर्तके ||

इतर पूर्व उपचार

यानंतर “श्रीअरुन्धतीसहित कश्यपादि सप्तऋषिभ्यो नमः| असे प्रत्येकवेळी म्हणून  आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, पंचामृतस्नान, गंधोदक स्नान, मांगलिक स्नान, शुद्धोदक स्नान इत्यादी सर्व फुलाने सिंचन करीत करावे.

 • पुर्वपूजन : यानंतर पुर्वपूजना करिता फुलं वाहून धूप – दीप व उर्वरित पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व वाहिलेली फुले (निर्माल्य) काढून अभिषेक करावा.
 • अभिषेक : फुलाने जलसिंचन करीत अभिषेक करावा.) यावेळी महिम्न आदी वा पुढील श्लोकाचे पठण करावे.

कश्यपोsत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोsथ गौतमः | जमदग्निर्वसिष्ठश्च साध्वी चैवाप्यरुन्धती ||

उत्तर पूजन

पुनः “श्रीअरुन्धतीसहित कश्यपादि सप्तऋषिभ्यो नमः| या श्लोकाने यज्ञोपवीत, कापसाचे वस्त्र, गंध, अक्षत, फुले, हळद-कुंकू, अलंकार आदी उपचार करावे.

आरती मंत्र

पुढीलप्रमाणे आरती करावी व त्यानंतर मंत्रपुष्पांजलि, प्रदक्षिणा व नमस्कार करावा.

चक्षुर्दं सर्वलोकानां तिमिरस्य निवारणम् |महादीपं प्रयच्छामि सप्तर्षीन्प्रतिवः शुभम् ||

प्रार्थना

एते सप्तर्षयः सर्वे भक्त्या संपूजिता मया | सर्व पापं व्यपोहन्तु ज्ञानतोsज्ञानतः कृतं ||
येषां प्रभावेण दिवौकराश्च महाप्रभावास्तपसो बलेन | लोकत्रयारिष्ट विनाशकानां पुर्णास्तु ऋषीणां इयमल्पपूजा ||

अर्घ्यप्रदान

उजव्या हातात गंध, अक्षत, पुष्प, सुपारी, नाणे घेवून त्यावर जल सोडून पुढील श्लोकांद्वारे अर्घ्य प्रदान करावा. “श्रीअरुन्धतीसहित कश्यपादि सप्तऋषिभ्यो नमः | इदं अर्घ्यं समर्पयामि ||

समारोप

पळीभर पाणी सोडावे. यानंतर वायन-दान करतात व नंतर आवाहित देवतांचे विसर्जन करतात. अनेन यथाज्ञानेन कृत श्रीअरुन्धतीसहित कश्यपादिसप्तर्षि देवताः प्रीयताम् ||

महत्त्व

 • यामध्ये कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, अत्री आणि वसिष्ठ पत्नी अरुंधती यांचे पूजन करतात.
 • हे प्राधान्याने स्त्रियांचे व्रत असून यादिवशी स्त्रिया कंदमुळांचा आहार करतात व बैलाच्या श्रमाचे काहीही खात नाहीत.
 • भारतीय संस्कृति आणि इतिहासात अनेक पुण्यात्मे होवून गेलेत ज्यांच्या कार्य कर्तृत्त्वाने त्यांना ऋषि, मुनि, संत, महात्मा आदी उपाधींनी समाजाने प्रतिष्ठित केले.
 • या सर्वांच्या पुण्यस्मरणानेही समस्त पापांचा नाश होतो असा येथील श्रद्धाभाव होय. म्हणूनच समाजातील विविध वर्ग विविध व्रतोत्सवांच्या माध्यमातून यांचे स्मरण, पूजन करताना दिसून येतो.
 • यापैकी ऋषीपंचमी हे असेच एक व्रतपर्व होय जे स्त्रिया आपल्या मार्जनाकरीता पूर्वापार करीत असल्याचे दिसून येते.
 • पूर्व ऋषींविषयीचा कृतज्ञता भाव याद्वारे व्यक्त होतो.

2 thoughts on “ऋषीपंचमी”

 1. श्री गजानन महाराजांचा समाधी दिवस म्हणून स्मरणात राहणाऱ्या ह्या दिवसाचं आणखी एक वेगळं महत्त्व आज कळलं. धन्यवाद

 2. आनंद गणोरकर

  भारतीय संस्कृतीत व्रतांचे अनन्य साधारण महत्व राहिले आहे,,पूर्वी घरा घरात स्त्रीया या व्रतस्थ असायच्या, आज ती व्रते केवळ शब्दात उरतेय का असे असतांना हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे,,
  ऋषि पंचमी म्हणजे त्या ऋषींचे स्मरण पूजन आहे,हे माहीतच नाही,, अनेकांना या मुळे , ज्यांच्या नावाने व्रत ठेवतात त्यांचे इतकं काय महत्व आहे,त्यांचे किती आणि काय कार्य होतं हे जाणून घ्यावेसे वाटलं तरी आपणा सर्वांचे हे परिश्रम सार्थकी लागले म्हणावे,, अनेकांना व्रत घ्यावेसे वाटले तर निश्चितच कल्याणप्रद होईलच,
  श्री मिलिंद देशपांडे,, श्री कुर्हेकर, तसेच श्री देवनाथ विद्यालयाच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *