संध्येची उत्पत्ती व काल : संध्येची उत्पत्ती ही भगवान ब्रह्मदेवांपासून सांगितली जाते. या पृथ्वीतलावरील सर्व द्विजांना प्रतिदिन अंतर्बाह्य पवित्र करणारे साधन म्हणजे संध्या होय. संध्योपासना हे नित्यकर्म असून याचा काल पुढील प्रमाणे सांगण्यात येतो,
उत्तमा तारकोपेता मध्यमा लुप्ततारका |अधमा सूर्यसहिता प्रात:संध्यात्रिधा स्मृता || (देवीभागवत ११.१६.०४)
अहोरात्रस्य या संधि: सूर्यनक्षत्र वर्जिता | सातुसंध्या समाख्याता मुनिभिस्तत्वदर्शिभि:|| (आचारभूषण)
संध्यावंदनाचे उद्दिष्ट:
म्हणून मनुष्याद्वारे कळत-नकळत घडणाऱ्या पापांपासून क्षालन होवून जीवनात कायिक, वाचिक व मानसिक शुचिता तथा तेज प्राप्त करणे, हे या विधीच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक प्रमुख उद्दिष्ट दिसून येते.
संध्यामुपासते ये तु सततं संशितंव्रतम् | विधूत पापास्तेयान्ति ब्रम्हलोकं सनातनम् || (अत्रिस्मृती)
संध्याहीनो शुचिर्नित्यो मनर्ह: सर्वकर्मसु |यदन्यत् कुरुते कर्म न तस्य फलभाग्भवेत् || (दक्षस्मृती २/२७)
संध्यावंदन विधीचे सामान्यतः प्रमुख अंग
- आचमन :
यामध्ये भगवान विष्णूचे स्मरण (२४ नावाने) केले जाते यापैकी प्रथम तीन नावे घेताना जल प्राशन केले जाते व चौथ्या वेळी हातावरून सोडले जाते व हात जोडून पुढील नावे घेतली जातात.
- प्राणायाम :
यावेळी गुरुमंत्राचा (गायत्री इ.) जप केल्या जातो तसेच पूरकामध्ये नीलवर्ण चतुर्भूज भगवान विष्णूंचे, कुंभकामध्ये हृदयस्थित रक्तवर्णी चतुर्मुखी ब्रह्माचे, रेचकामध्ये ललाटस्थित श्वेतवर्णी भगवान शंकराचे ध्यान केले जाते. याद्वारे शरीर स्वास्थ्य व तेज दोन्हींची प्राप्ती होते.
श्वास अन्दर लेना | (पूरक)
श्वास रोके रखना | (कुम्भक)
श्वास बाहर छोड़ना | (रेचक)
अगर्भो ध्यानमात्रं तु स चा मन्त्रः प्रकीर्तिताः || (दे.पु. ११.२०.३४)
- प्रथम मार्जन :
मस्तकावर (शरीरावर) समंत्रक आठ वेळा जलसिंचन केले जाते व बाह्य शुद्धी साध्य केली जाते.
विप्रुशोष्टौ क्षिपेन्मूर्ध्नि अथोयस्यक्षयायच| (व्यासस्मृती)
- मंत्राचमन :
कायिक, वाचिक, मानसिक इत्यादी पातकनिवृत्त्यर्थ समंत्रक जल प्राशन करून आचमन केले जाते. येथे कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी साध्य केली जाते.
- द्वितीय मार्जन :
पुन्हा मस्तकावर (शरीरावर) समंत्रक जल सिंचन केले जाते व पुनः बाह्य शुद्धी साध्य केली जाते.
- अघमर्षण :
उजव्या हातात जल घेऊन समंत्रक उच्छ्वास उजव्या नासपुटाद्वारे सोडून त्याकडे दृष्टी जावू न देता ते मागे टाकले जाते. अघ म्हणजे अंतर्पाप वा वाईट वृत्तींचा त्याग साध्य केलेला दिसून येतो. येथपर्यंत सकल शुद्धी व पवित्रता प्राप्त करून पुढे श्रीसूर्य पूजन, अर्घ्यदान व जप इ. विशेष विधी प्रारंभ केले जातात.
- श्रीसूर्यअर्घ्यदान :
नूतन पात्रात नूतन जल तसेच गंध फुल एकत्रित घेवून अंजुली पासून अंगुष्ठ दूर ठेवून समंत्रक तीन अर्घ्य (तसेच संध्यावंदन कालास विलंब झाल्यास चौथा) अर्घ्य श्रीसूर्यनारायणास उभे राहून दिले जातात. प्रातः तथा मध्यान्ह पूर्वाभिमुख उभे राहून अर्घ्य दिले जातात. सायं पश्चिमाभिमुख बसून अर्घ्य दिले जातात.
अर्घ्य दिलेल्या जलाचा नेत्रांना तथा मस्तकास स्पर्श केल्या जातो तसेच उर्वरित जल पवित्र वृक्षांत विसर्जित केले जाते.
ईशन्नम्र: प्रभातेवै मध्याह्ने दंडवत्स्थित: | आसने चोsपविष्टस्तुद्विज: सायंक्षिपेदप : || (देवीभागवत ११.१६.५२)
जलेष्वर्घ्यं प्रदातव्यम् जलाभावे शुचिस्थले | संप्रोक्ष्य वारिणासम्यक ततोर्घ्यंतु प्रदापयेत् || (अग्निस्मृती)
मुक्तहस्तं न दातव्यं मुद्रां तत्र न कारयेत् | तर्जन्यंगुष्ठ योगेन राक्षसी मुद्रिका स्मृता |
राक्षसी मुद्रिकार्घ्येण तत्तोयं रुधिरं भवेत् || (देवीभागवत ११.१६.४९)
- पृथ्वीपूजन / आसनविधी :
आचमन प्राणायाम करून पृथ्वी मातेचे पूजन व वंदन केले जाते. तसेच आसनविधी केला जातो.
- न्यास / मुद्रा / जप :
यामध्ये समंत्रक षडंगन्यास, करन्यास व हृदयादिन्यास केले जातात व गुरुमंत्राचा (श्रीगायत्री इ.) जप (१०८ / किमान १०) केल्या जातो तसेच जपापूर्वी २४ व जपानंतर ८ मुद्रा केल्या जातात.
सुमुखं संपुटंचैव विततं विस्तृतं तथा |द्विमुखं त्रिमुखं चैव चतुष्पंच मुखंतथा ||
षण्मुखाsधो मुखं चैव व्यापकांजलिकं तथा | शकटं यमपाशंच ग्रंथितं चोन्मुकोन्मुखम् ||
प्रलम्बं मुष्टिकं चैव मत्स्य: कूर्मो वराहकम् | सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा||
एता मुद्राश्चतुर्विंशज्जपादौपरिकीर्तिता: | सुरभीर्ज्ञान वैराग्ये योनि: शंखोsथ पंकजम् |
लिंग निर्वाण मुद्राश्च जपांतेष्टौ प्रदर्शयेत् ||
- उपस्थान व कर्म समर्पण :
येथे श्रीसूर्यनारायणाची स्तुती, उपस्थान, दिशावंदन, चराचरातील सर्व देवतांना वंदन, माता-पिता-गुरू इ. ना अभिवादन करून तीन स्वप्रदक्षिणा केल्या जातात. आपल्या सभोवतालच्या व वातावरणातील प्रत्येक घटकाच्या कल्याणाची व मंगलतेची कामना करीत संध्यावंदन विधी परमेश्वरास समर्पित केला जातो.
संध्यावंदन का महत्त्व :
संध्यावंदनाचे अनन्यसाधारण महत्त्व वैदिक धर्मात प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेले दिसून येते, म्हणून प्रत्येक व्यक्तीने अखण्ड (नित्य) संध्यावंदन केले पाहिजे. आपल्या आचार्यांकडून संध्यावंदन विधीचे अध्ययन करून आणि हा विधी मुखोद्गत करून अतिशय अल्प वेळेत हे कर्म साध्य करता येते.
राष्ट्रक्षोभे नृपक्षोभे रोगार्ते भय आगते |
देवाग्निव्दिज भूपानाम् कार्येमहती संस्थिते |
संध्याहीनौनदोषोsस्ति यतस्तत्पुण्यसाधनम् || (जमदग्नी स्मृती)
देवी भागवतात (११.१६.६) असे सांगितले आहे,
विप्रो वृक्षो मूलकान्यत्र संध्या वेदा:शाखा धर्मकर्माणि पत्रम् | तस्मान्मूलं यत्न तो रक्षणीयं छिन्ने मूलेनैव वृक्षो न शाखा ||
अर्थात,
जसे वृक्षाचे मूळ नष्ट झाल्यास वृक्ष व त्याचा शाखांचा विस्तार होत नाही, त्याचप्रमाणे या विप्रस्वरूपी मनुष्याचे मूल म्हणजे त्याला कायिक, वाचिक, मानसिक शुचिता व अर्घ्यदान, जप, गुरु-अभिवादन इ. द्वारे तेज प्रदान करणारे संध्यावंदन होय.
अतः ज्याला स्वतः वैदिक संस्कृति व परंपरेचा संवाहक होवून धर्म, अर्थ, काम, मोक्ष आदी चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करावयाचे आहेत, त्याने नित्य संध्यावंदन करावे असा भगवतीचा उपदेश होय.
नित्य संध्यावंदन करूया राष्ट्र तथा धर्म बलशाली बनवूया |
Excellent information.
अतिशय कल्याणकारी, अत्यावश्यक संध्याकर्माचे ज्ञानार्जन दिले.
धन्यवाद🙏🙏🙏
अत्यंत उपयुक्त माहिती. युवापिढीस अनुसरणीय.
अत्यंत महत्वपूर्ण माहिती
संध्या वंदना चे महत्व खुप छान सांगितले आहे
श्री सदगुरू नाथ महारज् की जय
अत्यंत उपयोगी अशी माहिती मिळाली
आपले बरेच ऑडिओ व्हिडिओ मी ऐकतो पाहतो ते अत्यंत सुंदर आणि सुस्पष्ट आहेत उपक्रम अत्यंत चांगला आहे, मी श्रीसूक्त पुरुष सूक्त विष्णुसहस्रनाम रामरक्षा आधी आपल्या ऐकल्यावर ज्या उच्चारातील चुका होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे,
झाल्यास ऋग्वेदीय संध्यचा चा सुस्पष्ट आवाजातील ऑडिओ व्हिडिओ मिशक्यळाल्यास अत्यंत उपयोगी ठरेल
धन्यवाद!
अत्यंत उपयोगी अशी माहिती मिळाली
आपले बरेच ऑडिओ व्हिडिओ मी ऐकतो पाहतो ते अत्यंत सुंदर आणि सुस्पष्ट आहेत उपक्रम अत्यंत चांगला आहे, मी श्रीसूक्त पुरुष सूक्त विष्णुसहस्रनाम रामरक्षा आधी आपल्या ऐकल्यावर ज्या उच्चारातील चुका होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करत आहे,
झाल्यास ऋग्वेदीय संध्ये चा सुस्पष्ट आवाजातील ऑडिओ व्हिडिओ मिळाल्यास अत्यंत उपयोगी ठरेल
धन्यवाद!