पितृ पंधरवाडा (श्राद्ध)
तिथी : भाद्रपद कृ. प्रतिपदा ते अमावस्या
श्राद्धसमय
“महालय पितृश्राद्धे अपरान्हव्यापिनी तिथिर्ग्राह्या |”
अर्थ – सूर्योदयापासून अठरा घटीकांपेक्षा जास्त असणारी तिथी ग्राह्य धरावी.
प्रस्तावना
- “जातस्य हि ध्रुवो मृत्युः”, जन्म घेतल्यानंतर मृत्यू हा निश्चितच होय.
- मृत्युच्या नंतर करण्यात येणारे निरनिराळे विधी विविध पंथ-संप्रदायात पहावयास मिळतात त्यापैकी ‘श्राद्ध’ हे हिंदू धर्मात पहावयास मिळणारी एक प्राचीन व तितकीच प्रगल्भ विधी पद्धती होय.
- ‘श्रद्धेने करावे ते श्राद्ध’, अशी याची एक सर्वश्रुत व्याख्या परंतु माता-पिता आदींच्या स्मरणार्थ करण्यात येणारे हे श्राद्ध तिथीनुसार करावे असे शास्त्रवचन होय. हे श्राद्ध करणारा अधिकारी पुत्र जाणावा असेही म्हणतात, “पुन्नाम नरकात् त्रायते इति पुत्रः |”
श्राद्ध का करावे ?
मनुष्याः प्रतिपद्यन्ते स्वर्गं नरकमेव वा | नैवान्ये प्राणिनः केचित् नान्यः प्राणी महाभाग फलयोनौ व्यवस्थितः ||
(विष्णुधर्मोत्तर पुराण २/११३/४-६)
अर्थ – मनुष्य जन्म प्राप्त होताच त्यास शुभ-अशुभ आदि बाबींचा स्पर्श होतो. तिर्यक योनीतील प्राणी (पशु-पक्षी इ.) मृत्युनंतर वायुरूपात विचरण करून पुढील योनीत जन्म घेण्यासाठी गर्भात प्रवेश करतात परंतु मनुष्य योनीचे असे नसल्याने त्यास श्राद्धादिक कर्मे करावी लागतात.
श्राद्ध म्हणजे काय ?
- “श्रद्धार्थं इदं श्राद्धम्|” (श्रद्धेकरिता केले जाणारे)
- “श्रद्धया कृतं संपादितं इदं श्राद्धम् |” (श्रद्धेने संपादित केले जाणारे कर्म)
- “श्रद्धया दीयते यस्मात् तत् श्राद्धम् |” (ज्यात श्रद्धेने काही दिले जाते)
- “श्रद्धया इदं श्राद्धम् |” (श्रद्धेने करावे ते)
श्राद्धाचे महत्त्व काय ?
- “श्राद्धात् परतरं नान्यत् श्रेयस्करं उदाहृतं | तस्मात् सर्व प्रयत्नेन श्राद्धं कुर्यात् विचक्षणः ||” – महर्षि सुमन्तु
अर्थात श्राद्धापेक्षा श्रेष्ठ दुसरा कुठलाच कल्याणकारी उपाय नाही. - “आयुः प्रजां धनं विद्यां स्वर्गं मोक्षं सुखानिच | प्रयच्छन्ति तथा राज्यं पितरः श्राद्ध तर्पिताः ||” – मार्कण्डेय पुराण
श्राद्ध, तर्पण आदींनी राज्य, आयु, प्रजा, धन, विद्या आदी विविध गोष्टींची अनुकुलता लाभते. - “देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यं |”- तै.उप.१/११/१
उपनिषद कथनानुसार श्राद्ध न करणे हा प्रमाद होय.
परिस्थितीनुसार श्राद्ध कसे करावे ?
- “वित्तशाठ्यम न समाचरेत |”
आपली परिस्थिती अनुकूल असता कंजुषी न करता श्रद्धापूर्वक श्राद्ध करावे. - “तस्मात् श्राद्धम् नरो भक्त्या शाकैरपि यथाविधि |”
आर्थिक परिस्थिति प्रतिकुल असता केवल शाक (भाजी) ने श्राद्ध करावे. - “तृणकाष्ठार्जनं कृत्वा प्रार्थयित्वा वरारकम् | करोति पितृकार्याणि ततो लक्षगुणं भवेत् ||”
तेही नसल्यास गवत- काष्ठ आदी गोळा करून ते विकावे, त्यातून भाजी आणून करावे. यातील अधिक कष्टाने अनंत फलप्राप्ती होते. तेही नसल्यास गाईस चारा घालावा. - “नमेस्ति वित्तं न धनं च नान्यत् श्रद्धोपयोग्यं स्व पितृन्नतोस्मि | तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैतौ कृतौ भुजौ वर्त्मनि मारुतस्य ||” – विष्णु पु.३/१४/३०
तेहि शक्य नसल्यास एकान्तात जाऊन दोन्ही भुजा वर करून वरील श्लोक म्हणावा.
श्राद्ध कुणी करावे ? (श्राद्धाधिकार)
- “मृते पितरि पुत्रेण क्रिया कार्या विधानतः | बहवः स्युर्यदा पुत्राः पितुरेकत्रवासिनः ||
सर्वेषां तु मतं कृत्वा ज्येष्ठेनैव तु यत्कृतं |द्रव्येण चा विभक्तेन सवैरेव कृतं भवेत् ||” – (श्राद्धप्रकाश)
ज्येष्ठ पुत्राने वा त्याच्या आज्ञेने इतर पुत्रांनी करावे. सर्व बंधू एकत्र येवू शकत नसतील तर मातापित्याचे श्राद्ध वेगवेगळे एकाच तिथीवर भिन्नस्थानी करता येते. - “स्त्रीणाममन्त्रकं श्राद्धम् |” – (हेमाद्रिवचन, निर्णयसिन्धु)
पुत्र नसल्यास नातू, जावई व कुणीही नसल्यास स्त्रीलाही श्राद्ध करता येते. नमः तथा अमुकदेवी असा उच्चार करून अमंत्रक श्राद्ध करावे.
सर्वपित्री अमावास्या महत्त्व
- ही तिथी सकल पितर देवतांच्या तृप्ती हेतू असलेली दिसून येते.
- आपल्या कुटुंब व परिवारात होवून गेलेले वडील, काका, मामा,मावसे, आई, मावशी, काकू, आत्या, भगिनी, बंधू, जावई, कुलपुरोहित, विद्यागुरु, मोक्षगुरू, उपकारकर्ते इ. च्या कृतज्ञतापूर्ण स्मरणार्थ हा दिवस पार पाडला जातो.
- या दिवशी हिरण्य, भरणी, चट, पिंडात्मक, महालय आदी श्राद्ध केले जातात. यामधील थोडक्यात ‘तील-तर्पण विधी’ असा केला जातो.
तर्पण विधी
- पूर्वाभिमुख आचमन करावे.
- “समस्त पितर तृप्ति हेतु तिल तर्पणं करिष्ये |”, असा संकल्प करावा.
- सव्याने देवतर्पण करावे व निवितिने ऋषितर्पण करावे.
- अपसव्याने पितृतर्पण करावे (हातात तिळ घेवून अंगठ्याकडून पाणी सोडावे)
- यावेळी पिता-पितामह-प्रपितामह, माता-पितामही-प्रपितामही, मातामह-मातृपितामह-मातृप्रपितामह, पितृव्य (काका), मातुल (मामा) इ. क्रमाने तर्पण केले जाते.
- घरातील पूर्वजांची प्रतिमा पुजून त्यास हार अर्पण करावा.
- बरेचदा एक मुद भात ‘काकबली’ म्हणून बाहेर ठेवला जातो व गाईला गहू खाऊ घातले जातात.
- या दिवशी शक्यतोवर एकभुक्त राहतात तसेच अभ्यंग, सुगंधी द्रव्यांचा वापर, मैथुन आदी वर्ज्य करतात.
पितृ वंदना
या दिवशी वेदोक्त पितृसुक्त, रक्षोघ्नसूक्त यांचे अभिश्रवण करावे तसेच मार्कंडेय पुराण अंतर्गत पुढील प्रार्थना म्हणावी. यांचे नित्य श्रवण वा नित्य पठणही पितृतृप्ती हेतू केले जाते.
रुचिरुवाच
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् | नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषां ||
इन्द्रादीनान्च नेतारो दक्षमारीचयोस्तथा | सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ||
मन्वादीनां मुनीन्द्राणाम् सुर्याचन्द्रमसोस्तथा | तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्सू दधावपि ||
नक्षत्राणां ग्रहाणांच वाय्वग्न्योर्नभसस्तथा | द्यावापृथिव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलिः ||
देवर्षीणां जनित्रुंश्च सर्वलोकनमस्कृतान् | अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येऽहं कृताञ्जलिः ||
प्रजापतेः कश्यपाय सोमाय वरुणाय च | योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः ||
नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु | स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ||
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधराम्स्तथा | नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहं ||
अग्निरुपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम् | अग्नीषोममयं विश्वं यत एतदशेषतः ||
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः | जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः ||
तेभ्योsखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः | नमो नमो नमस्तेमे प्रसीदन्तु स्वधाभुजः ||
Upayukta mahiti milali.
Dhanyawad.
खूप छान माहितीपूर्ण.
Very nice! Appropriate information for current generation. 👌
फार छान आणि अतिशय महत्वपूर्ण, सुयोग्य माहिती उपलब्ध झाली आहे.
नमस्कार 🙏
सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती व दिशा
खुप समर्पक अशी माहिती वाचायला मिळाली त्या बद्दल जगद्गुरु श्रीदेवनाथ वेदविद्यालयाच्या आचार्य चे शत: शा आभार.
धन्यवाद!!!
informative
इतका शांतपणे श्राध्द याविषयावर विचार केला नव्हता,अर्थ आणि महत्व समजले,उपयुक्त माहिती
Khup chan mahiti … dhanyavaad 🙏🙏
гѓ—гѓ¬гѓ‰гѓ‹гѓігЃ®йЈІгЃїж–№гЃЁеЉ№жћњ – プレドニンジェネリック йЂљиІ© г‚ёг‚№гѓгѓћгѓѓг‚ЇйЂљиІ©гЃЉгЃ™гЃ™г‚Ѓ
Your comment is awaiting moderation.