विजयादशमी
प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध या दिवशी केला व विजय संपादन केला. रावणाची दहा शिरे हरण केली म्हणून या दिवसाला “दशहरा”, असेही म्हटले जाते.
प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध या दिवशी केला व विजय संपादन केला. रावणाची दहा शिरे हरण केली म्हणून या दिवसाला “दशहरा”, असेही म्हटले जाते.
हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.