शारदीय नवरात्र

उत्सवाचे नाव : शारदीय नवरात्र
उत्सव समय : यावर्षी अधिक अश्विनमुळे निज आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गा यांचा उत्सव साजरा करतात.

उदये तु त्रिमुहुर्त व्यापिनी प्रतिपत् ग्राह्या | अमायुक्ता न कर्तव्या प्रतिपच्चण्डिकार्चने ||

 • सर्वसाधारणपणे अमावास्यायुक्त प्रतिपदा घेऊ नये. सूर्योदयापासून सहा घटिकापर्यंत असेल तर दुसऱ्या दिवसाची घ्यावी. प्रतिपदेचा क्षय असेल तरच अमावास्यांयुक्त घ्यावी. सुतक वा सोयर असल्यास पुरोहिताद्वारे स्थापना व उत्थापन करावे.
 • आपापल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना करावी. यामध्ये साधारणतः ‘ अखंडदीप, मालाबंधन, सप्तशतीपाठ, कुमारिका पूजन-भोजन, अष्टमीस होमहवन इ. विविध आचार पाहावयास मिळतात.

घटस्थापना

 • घट – हा मृत्तिका वा ताम्राचा असतो.
 • घटावरील देवता –
 • कुलाचारानुसार काही ठिकाणी देवीची प्रतिमा ठेवतात.
 • काही ठिकाणी दीप ठेवला जातो.
 • बऱ्याच ठिकाणी नारळ ठेवतात

पूजा पद्धती

 • प्रातःकाळी स्नानादींनी शुचिर्भूत व्हावे.
 • आचमन, प्राणायाम करून घरातील देवता व ज्येष्ठांना वंदन करावे.
 • पुढीलप्रमाणे संकल्प सोडावा,

मम सकुटुंबस्य त्रिगुणात्मक श्रीदुर्गाप्रीतिद्वारा सर्वापच्च्छान्तिपुर्वक दीर्घायुर्धनपुत्रादि वृद्धि समस्त शत्रु पराजय कीर्तिलाभ सिध्यर्थं अद्य दिनादारभ्य नवमी पर्यन्तं त्रिगुणात्मिका श्रीदुर्गा प्रीत्यर्थे मालाबन्धन, अखन्ददीपघटस्थापना पूर्वकं (तथा च श्री सप्तशती पाठ पूर्वकं उपवास नक्तै भुक्तान्यतम नियमादिरुपं) श्री शारदा नवरात्र पूजनं करिष्ये |

 • श्रीगणेश, पृथ्वी, कलश, शंख, घंटादीप पूजन करावे.

घटस्थापन विधी

 • तांबड्या मातीमध्ये गहू मिसळून त्याची वेदि करावी जी देवतेच्या उजव्या बाजूस करावी. 
 • त्यावर घट ठेवावा व त्यास सूत गुंडाळावे.
 • त्यामध्ये पंचपल्लव, सर्व औषधी (उपलब्ध असल्यास), सुपारी, नाणे, कापूर इत्यादी घालावेत.
 • त्यामध्ये गंध,फुल अर्पण करावे.
 • घटाभोवती पुनः मातीचे वेष्टन करून त्यामध्ये धान्यादी टाकावे व सभोवती जलसिंचन करावे. यावेळी पुढील मंत्र म्हणतात,

पर्जन्याय प्रगायत दिवस्पुत्राय मीळ्हुषे | सनोयवसमिच्छतु ||
वर्षन्तुते विभावरी दिवो अभ्रस्व विद्युतः | रोहन्तु सर्वं बीजान्यव ब्रह्मद्विषो जहि ||

घटप्रार्थना

देव दानव संवादे मध्यमानो महोदधौ | उत्पन्नोऽसि यदा कुम्भ विधृतो विष्णुना स्वयं ||
त्वत्तोये सर्व तीर्थानि देवाः सर्व त्वयि स्थिता | त्वयि तिष्ठन्ति भूतानां त्वयि प्राणाः प्रतिष्ठिताः ||
शिवाः स्वयत्वमेवासि विष्णुस्त्वंच प्रजापतिः | आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवोः सपैतृकाः ||
त्वयि तिष्ठति सर्वेऽपि यतः काम फलप्रदः | तवत्प्रसादादिनां पूजां कर्तुमी हे जलोद्भव ||
सान्निध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा | अनया पूजया वरुणाद्यांवाहित देवताः प्रसन्नो भव ||

 • अखंड दीपपूजन :
  तुपाचा दिवा असल्यास घटाचे उजव्या बाजूस व तेलाचा दिवा असल्यास डाव्या बाजूस स्थापित करावा. दिव्याखाली ऐं ह्रीं श्री वास्तुपुरुषाय नमः असे म्हणून गंध,फुल वहावे व ऐं ह्रीं दिपाय नमः असे म्हणत दिव्याचे पंचोपचार (गंध,अक्षत,फुल,धूप,दीप,नैवेद्य) पूजन करावे.
 • दीप प्रार्थना

अखण्डं दीपकं देव्याः प्रीयते नवरात्रकं | उज्वलाये अहोरात्रं ऐकाचित्तो दृढव्रतः ||
अस्मिन्क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्न सिद्धि हेतवे | लक्ष्मीयन्त्रस्य पूजार्थ अनुज्ञां दातुमर्हसि ||

 • देवता आवाहन :
  यानंतर घटावर पूर्णपात्र ठेवावे. ज्यांच्याकडे घटावर दीप असेल त्यांनी एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यावर चार सुपार्या ठेवाव्या. नारळ ठेवत असतील त्यांनी नारळावरच आवाहन करावे. प्रथम सुपारीवर नवदुर्गांचे आवाहन करावे,

शैलपुत्र्यै नमः, ब्रह्मचारिण्यै नमः, चन्द्रघण्टायै नमः, कुष्माण्डायै नमः, स्कन्दमात्रे नमः,कात्यायन्यै नमः, कालरात्र्यै नमः, महागौर्यै नमः, सिद्धिदात्र्यै नमः

मध्यभागी तीन सुपाऱ्या ठेवाव्यात व आवाहन करावे,

महाकाल्यै नमः, महालक्ष्म्यै नमः, महासरस्वत्यै नमः

 • प्राणप्रतिष्ठा : आवाहन झाल्यावर घट / कलश यास हात लावून प्रणवावृत्ती करीत प्राणप्रतिष्ठा करावी,

अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यैः प्राणा क्षरन्तु च | अस्यै देवत्वमर्चायै मामहेतिच कच्चन ||

 • ध्यान :

ॐ विद्युद्दाम-सम-प्रभां मृग-पति-स्कन्ध-स्थितां भीषणाम्। कन्याभिः करवाल-खेट-विलसद् -हस्ताभिरासेविताम् ।।
हस्तैश्चक्र-गदाऽसि-खेट-विशिखांश्चापं गुणं तर्जनीम्। विभ्राणामनलात्मिकां शशि-धरां दुर्गां त्रिनेत्रां भजे ।।

 • आवाहन :

आगच्च्छत्वं महादेवि स्थाने चात्र स्थिरा भव |यावत्पुजां करिष्यामि तावत्वं सन्निधौ भव ||
श्री त्रिगुणात्मिका जगदंबायै नमः | आवहयामि |

 • पूर्वपूजन : आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, पंचामृतस्नान, गंधोदक स्नान, मांगलिक स्नान, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य (शेष पंचामृत) आदींनी पूर्वपूजन करावे.

अनेन पुर्वाराधनेन तेनश्री अवाहित देवताः प्रीयन्तां | उत्तरे निर्माल्यं विसृज्य | अन्यत्र पुष्पं धारयेत् | अभिषेकं कुर्यात् |

 • अभिषेक : पुरुषसुक्त, श्रीसूक्त, श्री दुर्गा सप्तश्लोकी व देवीच्या विविध सूक्त, स्तोत्रांनी अभिषेक करावा.
 • उत्तरपूजन : वस्त्र, गन्ध, अक्षत, फुले, हळद-कुंकू, धूप, दीप, नैवेद्य आदींनी उत्तरपूजन
 • मालाबंधन : याप्रमाणे प्रत्येक दिवशी द्वितियेन्हि, तृतीयेन्हि ….नवमेन्हि असे म्हणावे.

मालादि सर्वदेवानां प्रीतिदा शुभदा यतः | लंबितासौ मया भक्त्या गृहाण जगदम्बिके ||
ग्रथितां तिलकल्हार जाती मन्दार चम्पकैः | पुष्पमालां प्रयच्छामि प्रथमेन्हि तवाम्बिके ||

 • प्रार्थना

पूजाफलानि कार्याद्येः सुकृतं यन्मयार्चितं | तत्सर्वं फलदं मेस्तु भक्ति मुक्त्यर्थं देहि मे ||

 • समारोप

अनेन कृत षोडशोपचार पूजनेन त्रिगुणात्मिका श्री जगदम्बा प्रीयन्ताम् |

महत्त्व व  विशेष

 • आश्विन शुक्ल प्रतिपदेला मातामह श्राद्ध देखील करतात.

जातमात्रोपि दौहित्रो जीवत्यपि च मातुले |कुर्यान्मातामहं श्राद्धं प्रतिपद्याश्विनेसिते ||

या दिवशी आइचे, वडिलांचे (मृत असता) उपवीत नातवाने श्राद्ध करावे. मुलाचा मामा जरी पितृश्राद्ध असेल तरीही नातवाने मातामह श्राद्ध करावे.

 • हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.

नव दुर्गा –

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच । सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवाकुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री

 • नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.
 • गुजरातमध्ये नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.दांडिया किंवा दांडिया रास हे समूहनृत्य विशेष करून नवरात्रात नाचले जाते.

8 thoughts on “शारदीय नवरात्र”

 1. श्रीरंग वासुदेवराव Kurhekar

  खूपच छान माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!!

 2. सागर कैलास वक्टे

  जय जय देवी आदिभवानी निजजनसुखदानी
  उदो उदो मंजिरे माये जय जय जगजननी
  खुपच सुंदर व उपयुक्त माहीती
  धन्यवाद🙏🙏🙏🙏

 3. Satyajit Sarangdhar Joshi

  अतिशय महत्वपूर्ण, उपयुक्त कुळाचार परिचय 🙏🙏🙏👌

  धन्यवाद 🌹🌹🌷🌺🌸🌼🌻💮

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *