विजयादशमी

उत्सवाचे नाव : विजयादशमी
उत्सव समय : अश्विन शु. दशमी 

इयं श्रवणसहिता नवमीयुक्ता चापराह्नव्यापिनी ग्राह्या | दिनद्वये श्रवणयोगेऽपि नवमीयुतैव | उत्तरदिन एव श्रवणयुक्ता तदा तुत्तरैव ||

तिथीविशेष

 • श्रवण नक्षत्रयुक्त विजयादशमी अत्यंत शुभ मानलेली आहे.
 • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने विद्यारंभ, प्रस्थान इत्यादींसाठी प्रशस्त मानली जाते.
 • या दिवशी शमी, आपटा, शस्त्र आदींची पूजा करतात.
 • या दिवशी श्री लक्ष्मी व्यंकटेश नवरात्र उत्सवाची समाप्ती येते ज्यामध्ये पंचसूक्त पवमान याचा अभिषेक करून खिचडी व खीर यांचा नैवेद्य अर्पण केल्या जातो.
 • ग्रामीण भागात गाईच्या शेणाचे दहा गोल दसरे करून त्याचे पूजन केले जात असल्याचे पाहावयास मिळते.
 • घरातील विविध शस्त्रांची तसेच प्रचलित पद्धतीनुसार वाहन, यंत्र आदींची पूजा देखील या दिवशी केली जाते.
 • शारदीय नवरात्रोत्सवाची समाप्ती हि नवमीला होत असून दसऱ्याच्या दिवशी श्री देवीस पालखीमधून सीमोल्लंघनास नेण्याची परंपरा दिसून येते.

आचारविधी

 • प्रातःकाळी उठून अभ्यंग स्नान करावे.
 • उत्तमोत्तम संकल्प करून देवतापूजन करावे.
 • नूतन वस्त्र परिधान करून शमीच्या वृक्षाचे पूजन करावे, शमी वृक्ष नसल्यास आपट्याच्या झाडाचे पूजन करावे व तेही शक्य नसल्यास पुढील श्लोकांद्वारे दोन्ही वृक्षांचे प्रार्थनापूर्वक स्मरण करावे,

शमी शमयते पापं शमी शत्रुविनाशिनी | धारिण्यर्जुन बाणानां रामस्य प्रियवादिनी ||
अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण | इष्टानां दर्शनं देहि शत्रूणां च विनाशनम् ||
अमन्गलानां शमनीं शमनीं दुष्कृतस्यच | दुःख प्रणाशिनीं धन्यां प्रपद्येऽहं शमीं शुभां ||

यानंतर विद्यार्थी वर्गाने श्री सरस्वती देवीचे पूजन करून नवीन विद्यापाठास आरंभ करावा.

नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे |  वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव ||

महत्त्व

 • प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध या दिवशी केला व विजय संपादन केला. रावणाची दहा शिरे हरण केली म्हणून या दिवसाला “दशहरा”, असेही म्हटले जाते.
 • अष्टभुजा महिषासुरमर्दिनी देवीने याच दिवशी महिषासुर राक्षसाचा वाढ करून देवांना विजय प्राप्त करून दिला.
 • पांडवांचा वनवास संपला तेव्हा त्यांनी याच शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे बाहेर काढून दोन्हींचे पूजन केले.
 • या पर्वावर घरातील ग्रंथांचे, शस्त्रांचे, यंत्रांचे पूजन करावे. 
 • दसऱ्याला विजयाचा मुहूर्त म्हणतात. सन्मार्गाने वाटचाल करून जीवन सुख शांतिमय करण्याचा, अविद्येवर विद्येचा, अधर्मावर धर्माचा, तमावर तेजाचा विजय साजरा करण्याचे प्रतीक म्हणजेच विजयादशमी होय.

1 thought on “विजयादशमी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *