सणाचे नाव : रक्षाबंधन
तिथि : श्रावण शु. पौर्णिमा
श्रावण पूर्णिमायां भद्रारहितायां त्रिमुहुर्ताधिकोद
यद्व्यापिण्यामपरान्हे प्रदोषे वा कार्यं |
इदं ग्रहण संक्रान्ति दिनेsपि कर्तव्यं ||
सूत्रबंधन संदर्भ
- नारद पुराणात (प्र.१२४)श्रावण पौर्णिमेला करण्यात येणाऱ्या वेदोपकर्म (वेद अध्ययन सुरु करणे ) विधीचा उल्लेख येतो, ज्यात शिष्याच्या संदर्भात सूत्र धारणाचा उल्लेख येतो.
- भविष्य पुराणात (अ.१३७,उत्तर पर्व) मध्ये सूत्र बंधनाचा संदर्भ येतो, जेथे वृत्रासुराचा वध करण्यासाठी इंद्राच्या पत्नीने देवराज इंद्राच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधले.
- “तन्न आ बध्नामि शतशारदाय आयुष्मान् जरदष्टिर्यथसत् |”
यजुर्वेदात शंभर वर्षे निरोगी जीवन जगून जीवनात चिरायुता प्राप्त करण्यासाठी परस्पर बंधन स्विकारण्याचा उपदेश केलेला दिसून येतो. (यजु. ३४.५२)
रक्षा बंधन विधी
- तांदूळ, सोने, पांढरी मोहरी यांची नवीन वस्त्रात पुरचुंडी करावी आणि ती आपले कुलदैवत वा उपास्य देवतेच्या चरणी वहावी.
- त्यावर पोवती / राखीचे पूजन करून ती ठेवावी.
(पोवती – ९ धाग्यांचे मिळून एक असे सूत्र करून त्यास ८ गाठी पाडतात. असे महालक्ष्मी उत्सवातही करतात, घरातील व्यक्तींच्या संख्येनुसार पोवत्या तयार करतात.) - त्यावर ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे आवाहन करून प्रणवाची (ओंकाराची) प्रतिष्ठा करावी.
- कुलाचाराप्रमाणे नैवेद्य दाखविल्यानंतर अपरान्हकाली (दुपारच्या वेळी) ही पोवती / राखी श्रीसूर्यनारायणास अर्पण करावी (दाखवावी).
- यानंतर पुढील श्लोक म्हणून घरातील पुण्यवती कडून बांधून घ्यावी.
- रक्षा सूत्र बंधन श्लोक –
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलाः |
तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षे माचल माचल ||
पारंपारिक महत्त्व
- मनुस्मृतीत असे सांगितले आहे,
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः |
यत्रै नास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलः क्रियाः ||
मनु महाराजांपासून ‘स्त्रीशक्ति’ चा आदर करावा असे सांगितले आहे. ज्याठिकाणी अनादर होईल तेथे सर्वच क्रिया विफल होतात. म्हणूनच हे सूत्र साधारणतः बहिण,पत्नी इ.द्वारा बांधण्यात येत असल्याचे दिसून येते. - भारतीय परंपरेनुसार रक्षाबंधन हे धर्म भावना निर्माण करणारे एक साधन आहे. गुरुशिष्य परंपरा यामध्ये सुद्धा रक्षासुत्र बांधतात. म्हणूनच गावातील पुरोहित वा गुरुकडून रक्षासुत्र बांधले जात असल्याचे बरेचदा पहावयास मिळते.
- जैन समुदाय रक्षा पर्व म्हणून हा सण साजरा करतात.
ऐतिहासिक महत्त्व
- वैदिक कालापासून रक्षाबंधन वा रक्षा मंगल ही प्रथा चालू असल्याचे दिसून येते.
- मोगल काळात कित्येक राजपूत स्त्रिया राखीबंधू बनवीत जे संकटकाल आल्यास राखीभगीनिच्या रक्षणार्थ धावून जात. उदेपुरची राणी कर्मावतीने गुजरातच्या बहादुरशहापासून रक्षण व्हावे म्हणून हुमायुनाला भाऊ मानून राखी पाठविली होती.
सामाजिक महत्त्व
- दक्षिण प्रांतात काही ठिकाणी हा सण कार्तिक महिन्यात करतात.
- यास नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.
- काश्मीर प्रांतात विशेषत्वाने याचे महत्व दिसून येते तसेच प्राचीन मान्यतेनुसार राखीपौर्णिमेला अमरनाथाचे षोडशोपचार पूजन केले जाते.
- आजच्या काळात रक्षासुत्र बंधन हे (राखी म्हणजेच राखणे) – परस्परांचे स्नेह संबंध, नाते व घनिष्ठ प्रेमाचे रक्षण करण्याचा व भ्रातृभाव वृद्धिंगत होण्याचा महत्वाचा बोध करून देते.
- हे बंधनाचे सूत्र सहजच आपल्यात पराक्रम, संयम व साहस निर्माण करणारे ठरते, जे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यास महत्वाचे ठरते.
Very informative.. people should reach out to our vaidic and paramparik knowledge more.. it’s the need of the hour..
अतिशय सुंदर माहिती
гѓ—гѓ¬гѓ‰гѓ‹гѓійЂљиІ© – г‚ўгѓўг‚г‚·гѓ«гЃ®иіје…Ґ жЈи¦Џе“Ѓг‚ёг‚№гѓгѓћгѓѓг‚ЇйЊ гЃ®жЈгЃ—い処方
Your comment is awaiting moderation.