रक्षाबंधन

सणाचे नाव : रक्षाबंधन
तिथि : श्रावण शु. पौर्णिमा

श्रावण पूर्णिमायां भद्रारहितायां त्रिमुहुर्ताधिकोद
यद्व्यापिण्यामपरान्हे प्रदोषे वा कार्यं |
इदं ग्रहण संक्रान्ति दिनेsपि कर्तव्यं ||

सूत्रबंधन संदर्भ

  • नारद पुराणात (प्र.१२४)श्रावण पौर्णिमेला करण्यात येणाऱ्या वेदोपकर्म (वेद अध्ययन सुरु करणे ) विधीचा उल्लेख येतो, ज्यात शिष्याच्या संदर्भात सूत्र धारणाचा उल्लेख येतो.
  • भविष्य पुराणात (अ.१३७,उत्तर पर्व) मध्ये सूत्र बंधनाचा संदर्भ येतो, जेथे वृत्रासुराचा वध करण्यासाठी इंद्राच्या पत्नीने देवराज इंद्राच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधले.
  • “तन्न आ बध्नामि शतशारदाय आयुष्मान् जरदष्टिर्यथसत् |”
    यजुर्वेदात शंभर वर्षे निरोगी जीवन जगून जीवनात चिरायुता प्राप्त करण्यासाठी परस्पर बंधन स्विकारण्याचा उपदेश केलेला दिसून येतो. (यजु. ३४.५२)

रक्षा बंधन विधी

  • तांदूळ, सोने, पांढरी मोहरी यांची नवीन वस्त्रात पुरचुंडी करावी आणि ती आपले कुलदैवत वा उपास्य देवतेच्या चरणी वहावी.
  • त्यावर पोवती / राखीचे पूजन करून ती ठेवावी.
    (पोवती – ९ धाग्यांचे मिळून एक असे सूत्र करून त्यास ८ गाठी पाडतात. असे महालक्ष्मी उत्सवातही करतात, घरातील व्यक्तींच्या संख्येनुसार पोवत्या तयार करतात.)
  • त्यावर ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे आवाहन करून प्रणवाची (ओंकाराची) प्रतिष्ठा करावी.
  • कुलाचाराप्रमाणे नैवेद्य दाखविल्यानंतर अपरान्हकाली (दुपारच्या वेळी) ही पोवती / राखी श्रीसूर्यनारायणास अर्पण करावी (दाखवावी).
  • यानंतर पुढील श्लोक म्हणून घरातील पुण्यवती कडून बांधून घ्यावी.
  • रक्षा सूत्र बंधन श्लोक

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलाः |
तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षे माचल माचल ||

पारंपारिक महत्त्व

  • मनुस्मृतीत असे सांगितले आहे,
    यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः |
    यत्रै नास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलः क्रियाः ||
    मनु महाराजांपासून ‘स्त्रीशक्ति’ चा आदर करावा असे सांगितले आहे. ज्याठिकाणी अनादर होईल तेथे सर्वच क्रिया विफल होतात. म्हणूनच हे सूत्र साधारणतः बहिण,पत्नी इ.द्वारा बांधण्यात येत असल्याचे दिसून येते.
  • भारतीय परंपरेनुसार रक्षाबंधन हे धर्म भावना निर्माण करणारे एक साधन आहे. गुरुशिष्य परंपरा यामध्ये सुद्धा रक्षासुत्र बांधतात. म्हणूनच गावातील पुरोहित वा गुरुकडून रक्षासुत्र बांधले जात असल्याचे बरेचदा पहावयास मिळते.
  • जैन समुदाय रक्षा पर्व म्हणून हा सण साजरा करतात.

ऐतिहासिक महत्त्व

  • वैदिक कालापासून रक्षाबंधन वा रक्षा मंगल ही प्रथा चालू असल्याचे दिसून येते.
  • मोगल काळात कित्येक राजपूत स्त्रिया राखीबंधू बनवीत जे संकटकाल आल्यास राखीभगीनिच्या रक्षणार्थ धावून जात. उदेपुरची राणी कर्मावतीने गुजरातच्या बहादुरशहापासून रक्षण व्हावे म्हणून हुमायुनाला भाऊ मानून राखी पाठविली होती.

सामाजिक महत्त्व

  • दक्षिण प्रांतात काही ठिकाणी हा सण कार्तिक महिन्यात करतात.
  • यास नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.
  • काश्मीर प्रांतात विशेषत्वाने याचे महत्व दिसून येते तसेच प्राचीन मान्यतेनुसार राखीपौर्णिमेला अमरनाथाचे षोडशोपचार पूजन केले जाते.
  • आजच्या काळात रक्षासुत्र बंधन हे (राखी म्हणजेच राखणे) – परस्परांचे स्नेह संबंध, नाते व घनिष्ठ प्रेमाचे रक्षण करण्याचा व भ्रातृभाव वृद्धिंगत होण्याचा महत्वाचा बोध करून देते.
  • हे बंधनाचे सूत्र सहजच आपल्यात पराक्रम, संयम व साहस निर्माण करणारे ठरते, जे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यास महत्वाचे ठरते.

2 thoughts on “रक्षाबंधन”

  1. Very informative.. people should reach out to our vaidic and paramparik knowledge more.. it’s the need of the hour..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *