श्रीगणेश चतुर्थी

सणाचे नाव : श्रीगणेश चतुर्थी
तिथि : भाद्रपद शु. चतुर्थी

सा मध्यव्यापिनी ग्राह्या | दिनद्वये साकल्येन मध्यान्हव्याप्तौ अव्याप्तौ वा |
चतुर्थी गणनाथस्य मातृविद्धा प्रशस्यते |
अस्यां चन्द्रदर्षने मिथ्याभिः दूषणं दोषः ||

चतुर्थी तृतीयायुक्त घेणे प्रशस्त मानले असून चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील दोष परिहार स्यमंतक मण्याच्या श्लोकाचे पठण केले जाते.
सिंहः प्रसेनमवधीत सिंहो जाम्बवता हतः |
सुकुमारक मा रोदिस्तव ह्येष स्यमन्तकः ||” (तिथीतत्त्व)

पार्थिव गणेश मूर्ती

साधारणतः एक वीत वा एक फुट उंचीची व मातीपासून (जलामध्ये विसर्जित होईल अशी माती) निर्माण केलेली असावी. यावर करावयाचे विविध पूजन उपचार हे फुलं / दुर्वा याद्वारे करावेत व एकवीस मोदकांचे वायन दान करावे.

पूजा साहित्य

१)हळदकुंकू पाळे २) फुले, दुर्वा, तुळस, बेल
३) नारळ, फळे ४) विड्याची पाने, सुपारी, चिल्लर नाणी
५) कापसाची वस्त्रे ६) पंचामृत, वायन
७) चौरंग, वाळू, वस्त्र ८) धूप, दीप, निरांजन, नैवेद्य

पूजा विधी

 • वंदन : घरातील थोरामोठ्यांना तसेच कुलदेवतेस वंदन करून पुजेस बसावे.
 • आचमन / प्राणायाम : तीन वेळेस पळीने पाणी प्राशन करून चौथ्यांदा सोडावे व प्राणायाम  करावा.
 • देवतास्मरण : (हात जोडावे)

कुलदेवताभ्यो नमः| ग्रामदेवताभ्यो नमः| एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः|

 • संकल्प : (पळीत पाणी घेवून सोडावे)

प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथाशक्ति सहित
प्राणप्रतिष्ठापूर्वकं ध्यान – आवाहनादि षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये|
तत्रादौ निर्विघ्नता सिध्यर्थं महागणपति स्मरणं शरीर शुध्यर्थं षडङ्गन्यासं पृथ्वी, कलश, शङ्ख, घण्टा पूजनं च करिष्ये |

यानंतर श्रीगणेश पूजन, कलश, पृथ्वी, कलश, शंख, घंटा व दीप पूजन करावे.

 • श्रीगणेश पूजन :

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || श्रीगणेशाय नमः ||

 • पृथ्वी पूजन :

पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता | त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् || भूम्यै नमः ||

 • न्यास विधि : विष्णवे नमः |”, असे १२ वेळा म्हणून डोक्यापासून पायापर्यन्त स्वतःची शरीर शुद्धि करावी.
 • कलश पूजन :

कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः |
मूले तत्रस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः || कलशाय नमः ||

 • शङ्ख पूजन :

त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे |
नमितः सर्व देवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते || शङ्खाय नमः ||

 • घण्टा पूजन :

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम् |
कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हान लक्षणम् || घण्टायै नमः ||

 • दीप पूजन :

भो दीप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः |
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वान्कामान्प्रयच्छ मे || दीपदेवताभ्यो नमः ||

 • आत्मशुद्धि: स्वतः वर व पूजा साहित्यावर शंख जल प्रोक्षण करावे.

शङ्खोदकेन पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षेत् |

प्राणप्रतिष्ठा विधी

श्री पार्थिव गणेशमूर्तीच्या हृदयाला उजव्या हाताने स्पर्श करून म्हणावे,

अस्यैः प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यैः प्राणाः क्षरन्तु च | अस्यै देवत्वमर्चायै मा महेतिच कच्चन ||
अस्यां मूर्तौ मम प्राण इह प्राणाः | अस्यां मूर्तौ मम जीव इह स्थितः ||

 • यानन्तर ‘श्री सिद्धिविनायकाय नमः |’, असे म्हणून देवाच्या डोक्यापासुन पायापर्यंत स्पर्श करावा.
 • देवाच्या डोळ्यांमधून तुपामध्ये भिजविलेली दुर्वा फिरवावी.
 • देवाला आरसा दाखवावा आणि गंध, फुलं, बालभोग (तूप-गुळ) अर्पण करावे.
 • पळीभर पाणी सोडावे, अनया पूजया श्रीसिद्धिविनायकः प्रीयताम् |

पूर्वपूजन

 • ध्यान : हातात अक्षता, बेल, फुले घेवून पुढील श्लोकांनी ध्यान करून अर्पण करावे.

एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं |
पाशान्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ||
श्री सिद्धीविनायकाय नमः || ध्यानं समर्पयामि ||

 • पूर्व उपचार : यानंतर श्री सिद्धीविनायकाय नमः | असे प्रत्येकवेळी म्हणून आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, पंचामृतस्नान, गंधोदक स्नान, मांगलिक स्नान, शुद्धोदक स्नान इत्यादी सर्व फुलाने सिंचन करीत करावे.
 • धूप, दीप, नैवेद्य : यानंतर पुर्वपूजना करिता फुलं वाहून धूप – दीप व उर्वरित पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
 • पुर्वपूजन समारोप : पळीभर पाणी सोडून वाहिलेली फुले (निर्माल्य) काढून अभिषेकाकरिता नवीन फुलं वहावीत.
  अनेन पुर्वाराधनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् |
 • अभिषेक : (फुलाने जलसिंचन करीत अभिषेक करावा.) यावेळी श्रीगणेशस्तुती पर श्री अथर्वशीर्ष पठण करावे.
 • उत्तर पूजन : पुनः श्री सिद्धीविनायकाय नमः || या श्लोकाने यज्ञोपवीत, कापसाचे वस्त्र, गंध,  अक्षत, फुले, हळद-कुंकू, शेंदूर, गुलाल, बुक्का, अत्तर, अलंकार आदी उपचार अर्पण करावे.
 • अंग पूजा : हातात अक्षत घेवून देवतेच्या चरणापासून ललाटापर्यंत अवयवांना चौदा ठिकाणी अर्पण कराव्या.

लंबोदराय नमः | – उदरं पूजयामि ||, गौरीसुताय नमः | – स्तनौ पूजयामि ||
गणपायकाय नामः | – हृदयं पूजयामि ||, स्थूलकर्णाय नमः | – कण्ठं पूजयामि ||
स्कन्दाग्रजाय नमः| – स्कन्धौ पूजयामि||, पाशहस्ताय नमः | – हस्तौ पूजयामि ||
गजवक्त्राय नमः | – वक्त्रं पूजयामि ||, विघ्नहर्त्रे नमः | – ललाटं पूजयामि ||
सर्वेश्वराय नमः | – शिरः पूजयामि ||, गणाधिपाय नमः | – सर्वाङ्गं पूजयामि ||

 • पत्र पूजा : पुढीलप्रमाणे प्रत्येक नाम घेवून पत्री वहाव्यात. (नसल्यास पुष्प वा अक्षत वहावी.)

गणेश्वराय नमः | – पादौ पूजयामि ||, विघ्नराजाय नमः | – जानुनी पूजयामि ||
आखुवाहनाय नमः | – ऊरु पूजयामि ||, हेरंबाय नमः | – कटीं पूजयामि ||
सुमुखाय नमः | – मधुमालती समर्पयामि ||, गणाधिपाय नमः | – बिल्वं समर्प.||
गजाननाय नमः | – श्वेत दुर्वा ||, लंबोदराय नमः | – बोरी ||
हरसूनवे नमः | – धोतरा ||, गजकर्णकाय नमः | – तुलसी ||
वक्रतुण्डाय नमः | – शमी ||, गुहाग्रजाय नमः | – आघाडा ||
एकदन्ताय नमः | – डोरली ||, विकटाय नमः | – कण्हेर ||
कपिलाय नमः | – रुई ||, गजदन्ताय नमः | – अर्जुन ||
विघ्नराजाय नमः | – विष्णुक्रान्ता ||, बटवे नमः | – डाळिम्ब ||
सुराग्रजाय नमः | – देवदार ||, भालचन्द्राय नमः | – मारवा ||
हेरंबाय नमः | – पिंपळ ||, चतुर्भुजाय नमः | – जाई ||
विनायकाय नमः | – केवडा ||, सर्वेश्वराय नमः | – हदगा ||

 • पुष्प पूजा : चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, धोतरा, सुर्यकमळ, कमळ, जास्वंद, मोगरा आदी विविध फुले अर्पण करावी.
 • यानंतर धूप, दीप, नैवेद्य, विडा – नारळ, दक्षिणा समर्पित करावी.
 • दुर्वा पूजन : यानंतर पुढील दहा नावांनी गंध, अक्षत (फुल) व दोन दुर्वा वहाव्यात. प्रत्येक नावानंतर दुर्वायुग्मं समर्पयामि |”, असे म्हणावे.

गणाधिपाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, उमापुत्राय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
अघनाशनाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, विनायकाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
ईशपुत्राय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
एकदन्ताय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, इभवक्त्राय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||
आखुवाहनाय नमः | – दुर्वायुग्मं समर्प. ||, कुमारगुरवे नमः | – दुर्वायुग्मं
समर्प. ||

 • यानंतर २१ वी दुर्वा पुढील श्लोक म्हणून वहावी.

गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन | एकदन्त भवक्त्रेति तथा मूषकवाहन ||
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक | कुमारगुरवे नित्यं पूजनीयः प्रयत्नतः ||
दूर्वामेकां समर्पयामि ||

 • आरती व मंत्रपुष्प : यानंतर आरती व मंत्रपुष्पांजली, प्रदक्षिणा व नमस्कार अर्पण करावा,

एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि | तन्नो दन्तिः प्रचोदयात् ||
मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ||

 • प्रार्थना

विनायक गणेशान सर्व देव नमस्कृत |पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्ननिवारय ||

 • वायनदान : पुढील श्लोक म्हणून वायन दान (लाल वस्त्रात बांधलेले एकवीस मोदक) करावे.

सघृतान् गुडसंमिश्रान् मोदकान् घृतपाचितान् |
वायनं मे गृहाणेदं वरं देहि विनायक ||

 • समारोप : (पळीभर पाणी सोडावे.) अनेन यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्री सिद्धिविनायक देवताः प्रीयेताम् |

श्रीगणेश विसर्जन

गणेश विसर्जन करण्यापूर्वी यथोपचार गणेशपूजन करावे तसेच पुढील श्लोक म्हणून गणपतीवर अक्षता वहाव्यात आणि पार्थिव गणेश मूर्ती उत्तरेकडे हलवावी.
यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् | इष्टकाम प्रसिध्यर्थं पुनरागमनाय च ||
विसर्जन प्रवाही जलात शक्य नसल्यास उपलब्ध जलात गंगा, फुलं, तुळस वहावी. त्यामध्ये पार्थिव मूर्तीचे विसर्जन करावे व पाणी झाडात प्रवाहित करावे.

संदर्भ व महत्त्व

 • श्रीगणेश चतुर्थी हा पूर्वापार साजरा करण्यात येणारा महत्त्वाचा भारतीय उत्सव होय, हिला वरद चतुर्थी व शिवा असेही म्हणतात.
 • गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी याचे पूजन करतात.
 • श्रीगणेशाला प्रिय चतुर्थी तिथी ही जागृती, स्वप्न, सुशुप्ती अशा तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अवस्था दर्शविते.
 • गणपतीचे महोत्कट विनायक, गुणेश, गणेश व धुम्रकेतू असे चार अवतार झाल्याचे गणेश पुराणात वर्णन येते.
 • परंपरेनुसार विद्यारंभ, विवाहादी संस्कार, प्रवेश, यात्रा संग्राम व संकटकाल आदी वेळी केलेले गणेश स्मरण / पूजन हे विघ्न दूर करणारे ठरते.

6 thoughts on “श्रीगणेश चतुर्थी”

 1. खुप सुगम व सरल मांडणी करुन दिली आहे। धन्यवाद

 2. Milind Prabhakar Deshpande

  शेवटी समारोप मधे श्री सिद्धी विनायक प्रियन्ताम असे म्हणावे
  थोड़ी टंकलेखन दुरुस्ती करावी

 3. मुक्तेश्वर शिंगरूप

  अतिशय सरल भाषेत व सर्वाना सहज करता येईल असा संपूर्ण पूजाविधी. खूप छान. नमस्कार।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *