सणाचे नाव : जन्माष्टमी
तिथि : श्रावण वद्य अष्टमी
इयं निशीथ व्यापिनी पूर्वा वा परा ग्राह्या |
उभयेद्युनिशीथयोगे अभावे वा परैव ||
अस्यां रोहिणी नक्षत्र योगे बुध सोमवार योगेच फलातिशयः ||
अर्थात – श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत कृष्णाचा जन्म झाला म्हणूनच रोहिणी नक्षत्र किंवा सोमवार/बुधवार युक्त अष्टमी तिथीला जन्माष्टमीचे व्रत करतात.
सर्वसाधारण पूजा विधी
- सप्तमीला एकभुक्त राहून अष्टमीला स्नानादी करून व्रताचा संकल्प करतात, “श्रीकृष्ण प्रीत्यर्थं सपरिवार श्रीकृष्णपूजां करिष्ये |”
- अष्टमीला सकाळी कुलाचार परंपरेनुसार पुरोहित आदींना बोलावून पवमानसूक्त आदिद्वारा अभिषेकपूर्वक श्रीकृष्णाचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करतात.
- यादिवशी उपवास करून देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात.
- आज आपल्या घरी भगवंत प्रकटणार या भावासह घरात अखण्ड कृष्णस्तुति, रोषणाई करून मङ्गलमय वातावरणात मंचकावर एका बाजूला देवकी व कृष्ण तर दुसऱ्या बाजूला यशोदा, तिची कन्या, वसुदेव, नंद यांची स्थापना करतात.
- महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गोकुळ करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये मृत्तिका मूर्ती करण्याचा प्रघात आहे. मूर्त्यांमध्ये राधाकृष्ण, सवंगडी, गाई, गोपी, तुळस इत्यादी बनवून त्यांची पूजा केली जाते.
- काही ठिकाणी केवळ घरात प्रतिष्ठित असलेल्या मूर्तीला सजवून एक आरास करतात.
- रात्रौ कथा, पुराण, नृत्य, गीत इ. कार्यक्रमांनी कृष्ण लीलांचे वर्णन करीत जागरण करतात आणि रात्रौ १२ वाजता जन्मसमय असल्याने श्रीकृष्ण चरित्राचे (जन्माचे) आख्यान करतानाच गुलाल, पुष्पे उधळून जन्मोत्सव साजरा करतात.
- काही ठिकाणी “रेशमी वस्त्र” (कद), याचे पिळे करून गाठ न पाडता मूर्ती बनवून अलंकार चढवितात. मातृभावातून जन्मोत्सव, न्हाणोरा, पाळणा इत्यादी करतात.
- यानंतर कुलाचार परंपरेनुसार पुरोहित आदींना बोलावून पवमान आदिद्वारा अभिषेकपूर्वक श्रीकृष्णाचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करतात.
- सर्व उपचार पूजन “ॐ नमो भगवते वासुदेवाय |”, या मंत्रोच्चाराने करतात.
- पुनश्च श्रीकृष्णाला नूतन वस्त्रे घालावी व गंध, पुष्प, अलंकार, माला आदी अर्पण करतात.
- यानंतर नामसंस्कार – कृष्ण कृष्ण असा जयघोष करतात
- नैवेद्य – बरेचदा मिठाई वा सुन्ठोडा, पंजिरी, फळे इ. अर्पण करतात.
- यानंतर आरती, मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना करतात.
दामोदराय विद्महे वासुदेवाय धीमही |
तन्नः कृष्णः प्रचोदयात् ||
प्रार्थना
योगेश्वराय देवाय योगानां पतये विभो |
योगेश्वराय नित्याय गोविन्दाय नमो नमः ||
यज्ञेश्वराय यज्ञाय तथा यज्ञोद्भवाय च |
यज्ञानां पतये नाथ गोविन्दाय नमो नमः ||
विश्वेश्वराय विश्वाय तथा विश्वोद्भवाय च |
विश्वस्य पतये तुभ्यं गोविन्दाय नमो नमः ||
- यानंतर पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यास ठेवतात.
- दुसऱ्या दिवशी दही, पोहे, लाह्या, लोणचे एकत्र करून काल्याचा नैवेद्य अर्पण करतात.
- काही ठिकाणी नवमीला अभिषेकादि पूजन करतात.
- या व्रताचे संतती, संपत्ती व अंती वैकुंठलोक प्राप्ती असे फल सांगितले जाते. (व्रतराज)
विशेष उत्सव पद्धती
- यदुवंशी लोक मूळपुरुष म्हणून श्रीकृष्णाची पूजा करतात तर महानुभाव पंथीय जन्माष्टमी उत्सव करतात.
- कित्येक वैष्णव दिपाराधना, पालखी, दोलोत्सव (वृंदावन), कृष्णलीलेचे खेळ, भागवत वाचन,कीर्तन, भजन, नृत्य-गायन इ.द्वारे (श्रावण कृ. प्रतिपदा ते अष्टमी) आठ दिवसांचा उत्सव करतात.
- महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला करतात. “गोविंदा आला रे आला | गोकुळात आनंद झाला ||”, असे गीत गात लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंड्या फोडतात.
पौराणिक इतिहास
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
- स्वायंभुव मनु काळात अति तपस्वी सुतपा व पुण्यवती पृश्नी यांचे पोटी “पृश्निगर्भ” म्हणून धर्म स्थापनेकरीता भगवान अवतीर्ण झाले. प्रत्येक अवतारात आम्हीच माता-पिता असावे असा वरदेखील यांनी प्राप्त केला.
- पुढे यांनीच कश्यप आणि अदिती म्हणून जन्म घेतला, ज्यांच्या पोटी भगवान “उपेंद्र” (वामन अवतार) म्हणून अवतरीत झाले.
- द्वापार युगात पुनः वसुदेव आणि देवकी ह्यांचे पोटी “भगवान श्रीकृष्ण” अवतीर्ण झालेत.
- आणि या दिवशी साजरा करण्यात येणारा उत्सव हा याच भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव होय.
उपास्य – उपासक भाव व उपासना पद्धती
नानाविध भक्त संप्रदाय हे प्राचीन इतिहासात होवून गेलेल्या कृष्ण उपासनांच्या आधारे आपल्या विशिष्ट भावातून कृष्णसेवा करतात. हे विविध भाव व त्यांचे आदर्श असे विषद करता येतील
- मातृभाव – यशोदा, देवकी
- गोपीभाव – गोप-गोपी (रासपूजन)
- पत्नीभाव – संत मीराबाई
- शिष्यभाव – अर्जुन
- भक्तभाव – उद्धव
- सखाभाव – सुदामा
भगवान श्रीकृष्ण – “कृष्णस्तु भगवान स्वयम् |“
- यास विष्णूच्या दशावतारातील आठवा अवतार म्हणून “पूर्णावतार” असेही म्हणतात.
- छान्दोग्योपनिषदात घोर आंगीरसाचा शिष्य देवकीपुत्र श्रीकृष्णांचा उल्लेख येतो.(३.१७.४.६)
- महाभारतात गर्ग्य आणि सांदिपनी शिष्य श्रीकृष्णांचा उल्लेख यतो, ज्यांनी अर्जुनास “श्रीमद भगवद्गीता” सांगितली.
- गोपालकृष्णाच्या बाललीलेचे संदर्भ अश्वघोषाच्या बुद्धचरितात आढळतात,
णच्चणसलाहणणिहेण पासपरिसंठीआ णिउणगोवी |
सरिसगोविआणे चुम्बई कवोलपडीमागअकेण्हम् || (गा.स. २.१४)
अर्थात – नाचण्याच्या श्रमांमुळे गोपींना घाम आला होता. त्यांच्या ओल्या गालांवर कृष्णाच्या प्रतिमा उमटल्या होत्या
- ब्रह्मसंहिता नामक ग्रंथात ही केवळ देवता नसून हे सर्वत्र व्यापक तत्व असल्याचे सांगण्यात येते. “अण्डान्तरस्थ परमाणु चयान्तरस्थं |” – अणु रेणुमध्ये व्याप्त असा.
- वारकरी संप्रदायात “वासुदेव हरी” अशी घोषणाच दिसून येते.
- कृष्ण आणि त्याचे मूल रूप विष्णू यांची उपासना तंत्रग्रंथातही आढळते जेथे यांस “स्वाधिष्ठान” चक्राची देवता मानले आहे.
- याशिवाय स्वामी नारायण, महानुभाव, चैतन्य, राधावल्लभ, निम्बार्क, वल्लभ अशा अनेक संप्रदायांचे आराध्य भगवान श्रीकृष्ण असल्याचे दिसून येते.
- संस्कृत व्याकरणग्रंथ पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये “वासुदेवार्जुनाभ्यां वुञ्” असे सूत्र होय.
- भारतवर्षात आजहि रूपगुण, साहस-पराक्रम, रीति-नीति, ज्ञान-तेज, व्यवहार-तत्त्वज्ञान, निःस्वार्थ राजकारणी व थोर वक्ता, कर्म-कर्तव्य, प्रेम-करुणा इत्यादि अनेकानेक वैशिष्ट्यांचा आदर्श म्हणून कृष्णचरित्राचे अध्ययन व भगवत्स्वरुपात पूजन केले जाते.
- भगवन श्रीकृष्णानी दिलेल्या गीतोपदेशा चे स्मरण करून त्यांना वंदन करूया,
“सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ||”
Very informative for all..👍👍
Scientific base for gokulashtami
Shri Krishna Janmotsav
सुंदर. जय श्रीकृष्ण
Добрый день!
Влажная уборка офиса – это услуга, которая гарантирует чистоту и порядок в вашем рабочем помещении. Мы обеспечиваем уборку полов, мебели и окон, создавая комфортную атмосферу для работы. Влажная уборка офиса с гарантией качества и эффективности. Наши специалисты работают быстро и профессионально. Закажите уборку и создайте идеальные условия для своей команды.
Клининг после ремонта цена – это доступные тарифы на профессиональную уборку. Мы убираем строительную пыль, мусор и пятна. Наши специалисты используют мощное оборудование. Мы работаем оперативно и качественно. Узнайте клининг после ремонта цена и закажите услугу.
Вся информация на сайте – https://service-cleanspb.ru/
сколько стоит помыть окна, уборка квартир заказать спб, генеральная уборка офисов клининг
стоимость уборки квартиры после ремонта, клининговая служба по уборке, уборка торговых помещений
Удачи!
Your comment is awaiting moderation.
Привет всем!
Клининговая компания уборка после смерти – это услуга, которая поможет вам в трудный момент. Мы предлагаем профессиональную уборку с соблюдением всех норм и стандартов. Клининговая компания уборка после смерти – это деликатный подход и высокое качество работы. Наши специалисты помогут вам пройти через трудную ситуацию. Закажите уборку и получите необходимую помощь.
Клининг на дом – это удобный сервис по уборке вашего жилья. Мы предлагаем генеральную, регулярную и срочную уборку. Наши специалисты работают с безопасными чистящими средствами. Мы гарантируем чистоту и порядок. Закажите клининг на дом прямо сейчас.
Вся информация на сайте – https://service-cleanspb.ru
клининговая уборка офиса, клининг услуги, клининговая компания уборка после пожара
срочная уборка, клининг после пожара, уборка после пожара спб
Удачи!
Your comment is awaiting moderation.